" माय "
माय तुझं रुप
जसं सखा पांडुरंग
माझ्या देहाला ग आई
तुझ्या दुधाचाच गंध ,
माय तुझे भाळ जणू
लाल सूर्य वाटे
तुझ्या अनवाणी पायी
जन्मांतरीचे काटे ,
माय तुझे हसू जणू
धरणाच वाहन
लेकराच्या पोटापायी
भाकरीची वाट पाहण ,
माय तुझे हात
औदार्याचा भास
तुझ्या पदरी सदा
गरिबीचा का वास,
माय तुझे डोळे
दोन अग्नीचे गोळे
अक्राळ गरीबीतही
तुला पुत्र सुखाचे डोहाळे,
माय तुझी कीर्ती
वाटे अजरामर व्हावी
तुझी वात्सल्याची मूर्ती
वाटे रात्र - दीन पहावी .............
-----------------------आनंद गुंडीले
Sir,khup chhan lihta tumhi...thank you so much
ReplyDeleteधन्यवाद...
DeleteSir,khup chhan lihta tumhi...thank you so much
ReplyDelete