Friday, 23 March 2012

"हे करणा " " जळते नीखारे " या काव्य संग्रहातून

"हे करणा "



हे करना,
आम्हालाही कवच - कुंडल
हवी आहेत तुझ्यासारखी
पण,अमरत्वाची नकोत
आमच रक्षण व्हावं
पापी, जातीवादी ,कर्मठ
नीतिभ्रष्ट लोकापासून
यासाठी........
एकवेळ कवच कुंडलाचे
दान दे तू आम्हाला....
करणा आमच्या संयमाचा कृष्ण
आता अधीर झालाय
न्यायाच सारथ्य करण्यासाठी
कारण, समाजरूपी पांडवानी
दीलेतच ऐवढे उपहासाचे चटके
जीवनही नीन्दनीय वाटू लागल्य
शकुनीच्या कुट नीतीतूनच
उगवलेल्या अन्याय, अत्याचार
आणी   बलात्काराच्या घटनानाही
ऊत आलाय आता गल्ली - बोळात 
गुन्हेगारी , बालकामगार , हुंडाबळी ,
बेकारी यांचे रौद्ररूपी महाभारत
घडू लागलंय या भूमीवर ,
त्यांच्याशी सामना करण्याची
ताकत हवीय आम्हाला
राजकीय दुर्योधनाच्या क्रुद्ध
साखर वाणीला न जुमानता,
मतिभ्रष्ट शकुनीच्या
कुटनीतीला  संपवत ,
जातीवादी ,धर्मांध पांडवाच्या
सामाजीक अराजक्तेचा
पराभव करणार आहोत आम्ही
न्यान्दानाचे शस्त्र हाती घेवून
वैचारिकतेच्या कुरुकशेत्रावर ,
आणी म्हणूनच तो न्यानाचा
कृष्ण आमच्या सोबत उतरतोय
या युद्धात अन्याया वीरोद्धात 
लक्शावधी सुशिक्षित तरुणाईचे
प्रतीनीधीत्व करत
म्हणून  म्हणतोय करणा
आता देवूनच टाक
तुझे दया ,सद्भावना , शांती
आणी बंधुभावाची कवच कुंडले
नव भारताची संकल्पना
सत्यात उतरवण्यासाठी  .............
----------आनंद गुंडीले

No comments:

Post a Comment