Monday, 3 September 2012
Friday, 23 March 2012
" माये ""जळते नीखारे" या कवीता संग्रहातून
" माये "
गौत्र माझे तूच हो
कुळ माझे तूच हो
धर्म ,दया ,शमा ,शांती
क्रांती माझी तूच हो,
तूच वीठल माझा
तूच माझा गोपाळ हरी
तूच नेत्रांची ज्योती
तूच नीसर्ग कडेकपारी
पडत्या काळात माझ्या
तूच मनाचे धैर्य
हात थर-थरतील माझे
तेव्हा तूच हो माझे शौर्य
हो आसमंतातील इंद्रधनु
गरिबीतील अशा हो
डौलणारे पीक हो
मुक्याचीही भाषा हो
आमच्या साठीच माये
प्रत्येकात अंश तुझा
लेकरा साठीच युगे -युगे
उदार गाभारा तुझ्या मनाचा ..........
--------आनंद गुंडीले
गौत्र माझे तूच हो
कुळ माझे तूच हो
धर्म ,दया ,शमा ,शांती
क्रांती माझी तूच हो,
तूच वीठल माझा
तूच माझा गोपाळ हरी
तूच नेत्रांची ज्योती
तूच नीसर्ग कडेकपारी
पडत्या काळात माझ्या
तूच मनाचे धैर्य
हात थर-थरतील माझे
तेव्हा तूच हो माझे शौर्य
हो आसमंतातील इंद्रधनु
गरिबीतील अशा हो
डौलणारे पीक हो
मुक्याचीही भाषा हो
आमच्या साठीच माये
प्रत्येकात अंश तुझा
लेकरा साठीच युगे -युगे
उदार गाभारा तुझ्या मनाचा ..........
--------आनंद गुंडीले
"हे करणा " " जळते नीखारे " या काव्य संग्रहातून
"हे करणा "
हे करना,
आम्हालाही कवच - कुंडल
हवी आहेत तुझ्यासारखी
पण,अमरत्वाची नकोत
आमच रक्षण व्हावं
पापी, जातीवादी ,कर्मठ
नीतिभ्रष्ट लोकापासून
यासाठी........
एकवेळ कवच कुंडलाचे
दान दे तू आम्हाला....
करणा आमच्या संयमाचा कृष्ण
आता अधीर झालाय
न्यायाच सारथ्य करण्यासाठी
कारण, समाजरूपी पांडवानी
दीलेतच ऐवढे उपहासाचे चटके
जीवनही नीन्दनीय वाटू लागल्य
शकुनीच्या कुट नीतीतूनच
उगवलेल्या अन्याय, अत्याचार
आणी बलात्काराच्या घटनानाही
ऊत आलाय आता गल्ली - बोळात
गुन्हेगारी , बालकामगार , हुंडाबळी ,
बेकारी यांचे रौद्ररूपी महाभारत
घडू लागलंय या भूमीवर ,
त्यांच्याशी सामना करण्याची
ताकत हवीय आम्हाला
राजकीय दुर्योधनाच्या क्रुद्ध
साखर वाणीला न जुमानता,
मतिभ्रष्ट शकुनीच्या
कुटनीतीला संपवत ,
जातीवादी ,धर्मांध पांडवाच्या
सामाजीक अराजक्तेचा
पराभव करणार आहोत आम्ही
न्यान्दानाचे शस्त्र हाती घेवून
वैचारिकतेच्या कुरुकशेत्रावर ,
आणी म्हणूनच तो न्यानाचा
कृष्ण आमच्या सोबत उतरतोय
या युद्धात अन्याया वीरोद्धात
लक्शावधी सुशिक्षित तरुणाईचे
प्रतीनीधीत्व करत
म्हणून म्हणतोय करणा
आता देवूनच टाक
तुझे दया ,सद्भावना , शांती
आणी बंधुभावाची कवच कुंडले
नव भारताची संकल्पना
सत्यात उतरवण्यासाठी .............
----------आनंद गुंडीले
हे करना,
आम्हालाही कवच - कुंडल
हवी आहेत तुझ्यासारखी
पण,अमरत्वाची नकोत
आमच रक्षण व्हावं
पापी, जातीवादी ,कर्मठ
नीतिभ्रष्ट लोकापासून
यासाठी........
एकवेळ कवच कुंडलाचे
दान दे तू आम्हाला....
करणा आमच्या संयमाचा कृष्ण
आता अधीर झालाय
न्यायाच सारथ्य करण्यासाठी
कारण, समाजरूपी पांडवानी
दीलेतच ऐवढे उपहासाचे चटके
जीवनही नीन्दनीय वाटू लागल्य
शकुनीच्या कुट नीतीतूनच
उगवलेल्या अन्याय, अत्याचार
आणी बलात्काराच्या घटनानाही
ऊत आलाय आता गल्ली - बोळात
गुन्हेगारी , बालकामगार , हुंडाबळी ,
बेकारी यांचे रौद्ररूपी महाभारत
घडू लागलंय या भूमीवर ,
त्यांच्याशी सामना करण्याची
ताकत हवीय आम्हाला
राजकीय दुर्योधनाच्या क्रुद्ध
साखर वाणीला न जुमानता,
मतिभ्रष्ट शकुनीच्या
कुटनीतीला संपवत ,
जातीवादी ,धर्मांध पांडवाच्या
सामाजीक अराजक्तेचा
पराभव करणार आहोत आम्ही
न्यान्दानाचे शस्त्र हाती घेवून
वैचारिकतेच्या कुरुकशेत्रावर ,
आणी म्हणूनच तो न्यानाचा
कृष्ण आमच्या सोबत उतरतोय
या युद्धात अन्याया वीरोद्धात
लक्शावधी सुशिक्षित तरुणाईचे
प्रतीनीधीत्व करत
म्हणून म्हणतोय करणा
आता देवूनच टाक
तुझे दया ,सद्भावना , शांती
आणी बंधुभावाची कवच कुंडले
नव भारताची संकल्पना
सत्यात उतरवण्यासाठी .............
----------आनंद गुंडीले
Tuesday, 20 March 2012
" एका मेक़्यनिकचा प्रेमयोग " -आनंद गुंडीले-तू एक मृगजळ या काव्य संग्रहातून
तू एक मृगजळ या काव्य sangrhatun |
तिच्या नजरेची हेडलाईट
माझ्या नजरेशी मिळाली
माझ्या मनाच्या टायरची
हवाच ढिल्ली झाली
तिच्या होकाराच्या पाण्याने
आमच्या प्रेमाचा नटबोल्ट आवळला
आमच्या वचनांचा पेट्रोल टेंक
आम्ही गदागदा ढवळला
सुरु झाली गाडी बोलाचालीची
वाढू लागली रीडिंग आमच्या प्रेमाची
पण , किती दिवस चालेल गाडी
कालानुरूप जुनी झाली थोडी
एक-मेकांच्या आवडीचे
टायर घासू लागले
आमच्या प्रेम इच्छेचे जणू
इंजिन काम बघा निघाले
आमच्या प्रेम गाड्याचा
अबोल गाडा झाला
ब्रेक न लागल्याने
अपघात झाला
अपघात झाला........
-आनंद गुंडीले
Monday, 19 March 2012
" गावचे गवत "-आनंद गुंडीले-जळते निखारे या काव्य संग्रहातून
जळते निखारे या काव्य संग्रहातून |
पूर्वी माझ्या गावात......
नांदायची शांती प्रत्येक घरात
प्रत्येक ओसरीला सुखाचे तोरण असायचे
हिंदू मुस्लीम सर्वांचे एकत्रच
दिवाळी आणि मोहरम असायचे
आंब्याच्या डहाळ्या,पांढरा कापूस,
प्रत्येक प्रहरी सूर्य बदलायचा कूस
हिरवी तूर , मुग ,हिरवाच तो हरभरा
शेतकरी राजा होई हर्षाने बावरा
डोंगर माथ्यावर छोटे देवूळ
तिथेच विठोबा अजून डौलतो आहे
रुक्मिणीशी वारकऱ्यांच्या गोष्टी
कानात अजून बोलतो आहे.....
पूर्वी माझ्या गावात..........
हरिणाचीही टोळी यायची
जमिनीचा तो ओळ सुवास
वसंतातील बहरही असायचा
आता हरिनच काय ?
कुत्राही जवळ येत नाही
पावसाने कहरच केला
आता दूरवरही दिसत नाही
वसंत तर विरूनच गेला
दुष्काळाने घातलाय घाला
सुखात राहणारा शेतकरी बाप
जिवंतपणीच कोलमडून गेला.......
आता माझ्या गावात.........
आपल्याच ओळखीचा तो पाऊस
काही केल्या दिसत नाही
कर्जाने वाडे ओसाड झाले
पीकही शेतात पिकत नाही
शेतातला अन्नदाता शेतकरी
मातीच्याही कथा सांगत नाही
हिरवे गवत, हिरवी कुरणे
पाण्याविन काहीच उगवत नाही
कर्ज काढून बापाने केली दिवाळी
बियाण्याचेही कर्ज फिटत नाही
आता माझ्या गावात..........
प्रत्येक घरी हीच अवस्था
दुष्काळ रुजू झाला जिथे
केले आयुष्याचे मातेरे शेतकऱ्याने
जन्मच संपतोय त्याचा अन्नावीन तिथे
प्रत्येक शेतकरी बाप आपला
कर्जाचे व्याज अजून भरतो आहे
फेडता न आले कर्ज वा व्याज तेव्हा
आत्महत्या करून मारतो आहे ....
-आनंद गुंडीले.
" रस्ता "--आनंद गुंडीले --जळते निखारे या काव्य संग्रहातून
जळते निखारे या काव्य संग्रहातून |
एका गावाच्या रस्त्यासाठी
तीस लाखांचा फंड आला
रस्ता मात्र मुरुमानेच
तीस हजारात पूर्ण झाला
पावसाळ्यात तोच चिखल
आणि तीच तारे वरची कसरत
प्रत्येकानेच चालायचं
हळूहळू घसरत घसरत
या रस्त्याने केला कहर
कुणालाच कळले नाही
रस्त्यावरच गिट्टीच्या हाद्र्याने
गाडीत बाळंत झाली बाई
पण, कुणाला रस्त्याची दुर्दश सांगून
उपयोग झाला न कांही ,
सरपंचाला सांगितले तेव्हा
ते गालातल्या गालात हसले , म्हणाले
दवाखान्याचा खर्च वाचवू
पैसे शाबूत राहतील घरातले
याच रोडवर गाडीत फिरवू
पोटुशी पेशंट गावातले........
--आनंद गुंडीले
" कमाई "जळते निखारे या काव्य संग्रहातून
जळते निखारे या काव्य संग्रहातून |
" कमाई "
दारूच्या नशेत तर्रर होवून
सायंकाळी हॉटेलात आला ' तो बाप ' ?
पोराचा दिवसभराचा रोजगार
रोजच्या प्रमाणे उकळण्यासाठी
नऊ वर्षाचा बच्चा हळहळला
त्याला वाटले...?
आपण दिवसभर राबायचे
हा येवून दारूत घालणार
आपली मेहनतीची ' कमाई '
घरची आठवली ती भाबडी बहिण
आणि तीन दिवसांची उपाशी आई
जर्जर आजाराने मृत्युशय्येवर
शेवटच्या घटका मोजत पहुडलेली
त्याने नकार दिला ' कमाई ' देण्यासाठी
पण अचानक
क्रुद्ध बापाच्या रक्तातील दारू
उसळून निघाली संतापाने
येवढ्यात जोरदार दगड पडला
त्या कोवळ्या जीवाच्या मस्तकात
आणि जीवन नावाची ' कमाई '
उधळली गेली मृत्युच्या दुकानात
आणि दारू पुन्हा सरस ठरली
बेगडी नैतिकतेच्या बाजारात
हमेशा सारखी..................
-आनंद गुंडीले
Sunday, 18 March 2012
" आंधळ्या प्रेमात "-आनंद गुंडीले
जळते निखारे या काव्य संग्रहातून
" आंधळ्या प्रेमात "
कॉलेज जवळची
कॅन्टीन
होते तिथे बाकडे
तीन
अभ्यासाचा ज्यांना
आला क्षीण
तेच तिथे बसतात........
अशीच तिथली एक
जोडी स्वभावात त्यांच्या
खूप गोडी
जुळल्या एकमेकांच्या
आवडी
म्हणूनच पडले ते प्रेमात........
एकमेकांशी लटकेच
भांडले
भांडणातूनही प्रेम
वाढले त्यानेही तिनेही बरेच
सोसले
प्रेम कल्लोळात........
पाहून नंतर विरोध
जगाचा
वेध घेतला त्यांनी
नभाचा
एकत्र निश्चय केला
मरण्याचा
अविचारानेच .....
काळ्या रात्रींनी त्यांना
घेरले
घरच्यानाही ते उशिरा
स्मरले
पण ,दोघेही होते
पूर्वीच हरले
जीवनासमोर .......
हि प्रेम पाखरांची
अवस्था पाहून
पाषानाचेही हृदय
आले भरून
काय मिळाले त्यांना
मरुन
आंधळ्या प्रेमात ...............
-------आनंद गुंडीले
कॉलेज जवळची
कॅन्टीन
होते तिथे बाकडे
तीन
अभ्यासाचा ज्यांना
आला क्षीण
तेच तिथे बसतात........
अशीच तिथली एक
जोडी स्वभावात त्यांच्या
खूप गोडी
जुळल्या एकमेकांच्या
आवडी
म्हणूनच पडले ते प्रेमात........
एकमेकांशी लटकेच
भांडले
भांडणातूनही प्रेम
वाढले त्यानेही तिनेही बरेच
सोसले
प्रेम कल्लोळात........
पाहून नंतर विरोध
जगाचा
वेध घेतला त्यांनी
नभाचा
एकत्र निश्चय केला
मरण्याचा
अविचारानेच .....
काळ्या रात्रींनी त्यांना
घेरले
घरच्यानाही ते उशिरा
स्मरले
पण ,दोघेही होते
पूर्वीच हरले
जीवनासमोर .......
हि प्रेम पाखरांची
अवस्था पाहून
पाषानाचेही हृदय
आले भरून
काय मिळाले त्यांना
मरुन
आंधळ्या प्रेमात ...............
-------आनंद गुंडीले
Saturday, 17 March 2012
" पूर्णवीराम " -आनंद गुंडीले
जळते नीखारे या काव्य संग्रहातून
" पूर्णवीराम "
जवळ असतानाही
वाटले मिळावीस तू
मागण्यापूर्वी.........
दुख शय्येवर असतानाही
वाटले हसावीस तू
हसवीन्यापुर्वी........
माझा अधीकार असावा
तुजवर कधीही
सांगण्यापूर्वी..........
अश्रू पुसावेत तुझे मी
अलगद हाताने
त्यांच्या येण्यापूर्वी............
मनालाही तुझी
चाहूल लागावी
तुझ्या आगमनापूर्वी............
माझ्या जीवनाला
पूर्णवीराम मीळावा
तुला विसरान्यापुर्वी ...............
-आनंद गुंडीले
" पूर्णवीराम "
जवळ असतानाही
वाटले मिळावीस तू
मागण्यापूर्वी.........
दुख शय्येवर असतानाही
वाटले हसावीस तू
हसवीन्यापुर्वी........
माझा अधीकार असावा
तुजवर कधीही
सांगण्यापूर्वी..........
अश्रू पुसावेत तुझे मी
अलगद हाताने
त्यांच्या येण्यापूर्वी............
मनालाही तुझी
चाहूल लागावी
तुझ्या आगमनापूर्वी............
माझ्या जीवनाला
पूर्णवीराम मीळावा
तुला विसरान्यापुर्वी ...............
-आनंद गुंडीले
Tuesday, 13 March 2012
" माय "
माय तुझं रुप
जसं सखा पांडुरंग
माझ्या देहाला ग आई
तुझ्या दुधाचाच गंध ,
माय तुझे भाळ जणू
लाल सूर्य वाटे
तुझ्या अनवाणी पायी
जन्मांतरीचे काटे ,
माय तुझे हसू जणू
धरणाच वाहन
लेकराच्या पोटापायी
भाकरीची वाट पाहण ,
माय तुझे हात
औदार्याचा भास
तुझ्या पदरी सदा
गरिबीचा का वास,
माय तुझे डोळे
दोन अग्नीचे गोळे
अक्राळ गरीबीतही
तुला पुत्र सुखाचे डोहाळे,
माय तुझी कीर्ती
वाटे अजरामर व्हावी
तुझी वात्सल्याची मूर्ती
वाटे रात्र - दीन पहावी .............
-----------------------आनंद गुंडीले
"आनंदायण" { चारोळी संग्रह }
"तो सुशीक्षीत बेकार म्हणून
त्याला बेकार भत्ता मिळायचा ,
पण येणारा तेवढा पैसा
जुगाराला तरी कुठे पुरायचा "
----आनंद गुंडीले"आनंदायण" { चारोळी संग्रह }
"रस्त्यातल्या भुकेल्याची
कीव मला आली ,
काही न देता त्याला
फक्त हलहल व्यक्त केली "
----आनंद गुंडीले ....
Sunday, 11 March 2012
Subscribe to:
Posts (Atom)