Saturday, 9 June 2018

👵🏻 माऊली ...👵🏻 (थकलेल्या देहाची विनवणी )???

👵🏻 माऊली ...👵🏻
(थकलेल्या देहाची विनवणी )??? 
आधुनिक काळातील पालकांच्या मनःस्थिति चा वेध घेणारी अप्रतिम कविता
जगातील सर्व माता - माऊलींना समर्पित...!🙏🏼🙏🏼


🍁🍂🍂🍂🍂🍁🍂🍂🍂🍂🍁           

      
 🍂🍂🍂🍁🍁🍁🍁🍂🍂🍂
            👵🏻 *माऊली* 👵🏻
          *थकलेल्या देहाची विनवणी*

      🍂🍂🍂🍁🍁🍁🍁🍂🍂🍂

दुःख मी पचवेन कसलेही
पण , ??
दयनीय नज़रेने पाहु नकोस 🙏🏼 
माझ्या खड़बड़ित हातात तुझा 
कोमल हात दिल्याशिवाय राहु नकोस...
नको तुझे सोने , पैका
नको तुजकडून मजला काही ,
*फक्त आलास तेव्हा म्हणत जा*
*कशी आहेस तु आई...*

लहानपणी दयायचास तसे
गोड स्मित बाळा देत जा,
विचारू नकोस आई काय हवयं 
फक्त आपुलकीने बघत जा ..
तु एकटाच आहेस माझा
दूसरे जवळ कुणी नाही 
*फक्त आलास तेव्हा म्हणत जा*
*कशी आहेस तु आई...*

भुक लागायची जेव्हा तुला
निस्वार्थ मायेने घास भरवले
पण , वृध्दत्वाने बाळा हे 
नश्वर शरीरही थकले
आवाज दयावासा वाटतो तुला
तरी कंठही फूटत नाही 
*फक्त आलास तेव्हा म्हणत जा*
*कशी आहेस तु आई...*


परक्या ठीकाणी काम तुझे
महीन्यानेच परत येतोस ,
आल्यानंतर मुलां - बाळातं
मनसोक्त रमुन जातोस..
मी ही तुझ्यात तशीच रमायचे
हे अजून मी विसरले नाही ,
*फक्त आलास तेव्हा म्हणत जा*
*कशी आहेस तु आई...*
            
             कवि - ॲड.आनंदराजे गुंडीले

073 8555 8666 / 08329 412 519

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

No comments:

Post a Comment