🌺❓ " का ..? " ❓🌺
असह्य वेदनांना असचं
सहायच का..?
याही दिवसांना जायला
सांगायचच का..?
अश्रुरुप नयनांनी
आठवायचा भूतकाळ,
मग असा भूतकाळ
घडवायचचं का...?
याही दिवसांना जायला
सांगायचच का..?
प्रयत्नाने जुळलेले नाते
क्षणभंगुर गोष्टीसाठी तोडुन
तेच नाते पुन्हा नव्याने
देवाकडे मागायचेच का?
याही दिवसांना जायला
सांगायचच का..?
भविष्याकडे नजर ठेवून
करायचं असतं बरच काही
जुन्या आठवणीत उगीच
रमायचचं का...?
याही दिवसांना जायला
सांगायचच का..?
कवी-अॅड.आनंदराजे गुंडीले
मो.०७३ ८५५५ ८६६६